Sunday, 8 October 2017

लुई ब्रेल


(सौजन्य :- विकीपेडिया )
  
जन्मजानेवारी ४ १८०९
कुपव्रे
मृत्यूजानेवारी ६ १८५२
नागरिकत्वफ्रान्स
वडीलसायमन-रेने ब्रेल
आईमोनीक बॅरन
 
                                                                            लुई ब्रेल

लुई ब्रेल (जानेवारी ४ १८०९ - जानेवारी ६ १८५२) हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्‍याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत.

बालपण[संपादन]

चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत. लुई तीन वर्षांचा असतांना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादत त्यांची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसर्‍या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला.

शिक्षण[संपादन]

लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली.
पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहासभूगोलगणितफ्रेंचग्रीकसंगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला.


हेलन ॲडम्स केलर
जन्महेलन ॲडम्स केलर
जून २७इ.स. १८८०
टस्कंबिया, अलाबामाअमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यूजून १इ.स. १९६८
ईस्टन, कनेटिकटअमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यूचे कारणमेंदूतील रक्तस्त्राव
चिरविश्रांतिस्थाननॅशनल कॅथेड्रल, वॉशिंग्टन, डी.सी.अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिकन
पेशाराजकीय कार्यकर्ती, व्याख्याती, समाजसेविका
कारकिर्दीचा काळइ.स. १९०९ - इ.स. १९६१
धर्मख्रिस्ती
वडीलआर्थर केलर
आईकेट ॲडम्स
पुरस्कारप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम
स्वाक्षरी
  हेलन केलर  
                                                                                   



डॉ. हेलन ॲडम्स केलर (जून २७इ.स. १८८० - जून १इ.स. १९६८) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणार्‍या त्या पहिल्या मूकबधीर व्यक्ती होत्या.

  

सुरुवातीचे दिवस[संपादन]

हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये टस्कंबियाअलाबामा येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एवी ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे [१] कप्‍तान होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधीरांसाठीचे पहिले शिक्षक होते.
हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या . लोहितांग ज्वर (स्कार्लेट फिवर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटीस) नंतर ती अंध आणि बधीर झाली.

  

प्राथमिक शिक्षण[संपादन]

मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किन्झ संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये हेलन केलर आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यूयॉर्कमधल्याबधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.



लेखन[संपादन]

केलर यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत.
  1. द फ्रॉस्ट किंग : वयाच्या ११ वर्षी त्यांनी द फ्रॉस्ट किंग (पुस्तक) (इ.स. १८८१) हे पुस्तक लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा द फ्रॉस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
  2. द स्टोरी ऑफ माय लाइफ : वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक) (इ.स. १९०३), सॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाचा काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दांत लिहिली आहे.
  3. द वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक) (इ.स. १९०८) साली प्रकाशित केले. या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. त्यांची ‘आऊट ऑफ द डार्’क, ही सामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका इ.स. १९१३ मध्ये प्रकाशित केली.




नंतरचे आयुष्य[संपादन]

इ.स. १९६१ मध्ये हेलन केलर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या घरातच होत्या. १४ सप्टेंबरइ.स. १९६४ रोजी राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन यांनी हेलन केलर यांना अमेरिकेमधील सर्व श्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम दिले. इ.स. १९६५ मध्ये त्यांची नॅशनल वीमेन्स हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी नंतरचे आयुष्य अमेरिकन फाउंडेशन, ह्या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले .१ जूनइ.स. १९६८ च्या रात्री आर्कन रीज, ईस्टन, कनेक्टिकट येथील घरात झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.

हेलन यांच्या नावाचे पुरस्कार[संपादन]

पुण्याच्या आडकर फाउंडेशन आणि श्यामची आई फाउंडेशन या संस्था अंधांकरिता काम करणार्‍या व्यक्तीला डॉ. हेलन केलर पुरस्कार देतात. २०१६ साली हा पुरस्कार पुणे विद्यापीठातील प्रगत तंत्र अंध विद्यार्थी केंद्राचे समन्वयक धनंजय भोळे यांना प्रदान करण्यात आला. (२७-६-२०१६). २०१५ साली हा पुरस्कार निरंजन पंड्या यांना मिळाला होता.







सेतू शाळा ............








========================================================================